पंजबामधील आनंदपूर साहिब येथे शीख समुदायाने 5 सप्टेंबर रोजी आपला मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा आयोजित करण्याला कारणही धक्कादायक आहे. येथील शीख समुदायातील नागरिकांचे ख्रिश्चन धर्मात जबदस्तीने धर्मांतर केल्याचं समोर आलं आहे. अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, यापुढे असे धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही ग्यानी हरप्रीत सिंग यांनी दिला आहे.

“आम्ही पंजाबमध्ये धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी अद्याप केली नाही आहे. आम्हाला ती नको आहे. पण, राज्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, शीख समुदायातील नागरिकांनी या कायद्याच्या मागणीबाबात गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे,” असे ग्यानी हरप्रीत सिंग यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं.

“शीख-हिंदू धर्मातील नागरिकांची दिशाभूल”

“मागील काही काळापासून तथाकथित ख्रिश्चन मिशनरी अंधश्रद्धेच्या माध्यमातून शीख धर्मांतील नागरिकांचे जबरदस्तीने धर्मांतर करत आहेत. ख्रिश्चन धर्म या अंधश्रद्धेच्या विरोधात असताना देखील, अशा पद्धतींचा अवलंब केला जात आहे. पंजाबमधील शीख आणि हिंदू धर्मातील नागरिकांना ख्रिश्चन बनवण्यासाठी त्यांची दिशाभूल केली जात आहे. हे सर्व सरकारच्या नाकाखाली सुरु आहे. भारतीय कायद्यात धर्मांच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, मतपेटीसाठी सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही,” असा आरोपही सिंग यांनी केला आहे.

“अंधश्रद्धेचा वापर शीख समुदायाला आमिष दाखवण्यासाठी”

“मिशनरी नागरिकांची दिशाभूल करुन जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे शीख समुदायातील काही जणांनी केल्या आहेत. मात्र, अजूनही पोलीस प्रशानसनाने याविरोधात कोणतीही कारवाई केली आहे. शीख समुदाय कोणत्याही धर्मांच्या अथवा त्यांच्या मूल्यांच्या विरोधात नाही. तर, धर्मांच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या विरोधात आहे. आम्ही स्वत: आमच्या धर्मातील अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. बायबल सुद्धा अशा लोकांची निंदा करते. पण, येथे अंधश्रद्धेचा वापर शीख समुदायातील नागरिकांना आमिष दाखवण्यासाठी केला जात आहे,” असेही ग्यानी हरप्रीत सिंग यांनी म्हटलं आहे.

Story img Loader