खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही फरार आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणाची पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. अशात महत्वाची घडामोड समोर आली आहे. अमृतपाल सिंग हा पंजाबमध्येच असल्याचं सांगण्यात येत आहे. अमृतपाल सुवर्ण मंदिरात अकाल तख्तवर जाऊन आत्मसमर्पण करू इच्छित असल्याचं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी सुवर्ण मंदिराच्या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृतपाल सिंग एका आंतरराष्ट्रीय माध्यमाला मुलाखत देण्यासाठी जालंधरला जात होता. पहिल्यांदा संपूर्ण प्रकरणाची माहिती द्यावी आणि नंतर पंजाब पोलिसांकडे आत्मसमपर्ण करावं, असा अमृतपाल सिंगचा प्लॅन होता. पण, याची माहिती पंजाब पोलिसांना आधीच मिळाल्याने अमृतपालचा प्लॅन फसला.

हेही वाचा : राहुल गांधी अपात्र, वायनाडमध्ये पोटनिवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले…

मंगळवारी अमृतपाल सिंग होशियारपूर येथे लपल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. फगवाडा येथे एका अज्ञात कारमध्ये अमृतपाल सिंग असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाठलाग केला. पण, मरनिया येथील गुरूद्वाऱ्याजवळ कारमधील लोक गाडी सोडून फरार झाले. यानंतर मरनिया गाव आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले. तसेच, अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री ‘घर ते घर’ तपासणी केली.

हेही वाचा : ३१व्या वर्षी जगभरात तब्बल ५५० मुलं, ‘स्पर्म डोनर’ आला गोत्यात, आता मारतोय कोर्टात चकरा; नेमकं काय घडलं?

कोण आहे अमृतपाल सिंग?

अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आहे. काही दिवसांपूर्वीच तो दुबईतून भारतात आला आहे. ‘वारिस पंजाब दे’ संघटनेची स्थापन पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याने केली होती. दीप सिद्धू याच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंगने ‘वारिस पंजाब दे’ संघटनेवर कब्जा केला. अमृतपाल सिंगचे दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.