पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या सरकारची स्थापना झाल्यापासून १० महिन्यांत एकूण २६०७४ नौकऱ्या दिल्या आहेत, असा दावा केला आहे. त्यांनी १८८ जणांना कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. या समारंभावेळी ते बोलत होते.
हेही वाचा >>PM CARES फंडवर सरकारची मालकी नाही, मोदी सरकारची न्यायालयात माहिती
योग्यतेवर आधारित नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे
“राज्य एक नवी क्रांती अनुभवत आहे. येथे युकवांना सरकारी नोकरी देऊन सशक्त केले जात आहे. मागील १० महिन्यांपासून योग्यतेवर आधारित नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत २६०७४ जणांना नोकरी देण्यात आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात तरुण-तरुणींना आणखी नोकऱ्या दिल्या जातील,” असे भगवंत मान म्हणाले.
हेही वाचा >> आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर, जाणून घ्या प्रमुख मुद्दे काय?
“निवडणुकीत अन्य पक्षांनी मतदारांना पक्त आश्वासन दिले होते. आम्ही मतदारांना हमी दिली होती. आम्ही हळूहळू दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू,” असेही भगवंत मान म्हणाले.
५०० आम आदमी क्लिनिकची सुरुवात
‘राज्य सरकारने प्रति महिना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे,’ असेही भगवंत मान यांनी सांगितले. पंजाब सरकारने नुकतेच ५०० आम आदमी क्लिनिक सुरू केले आहेत. याबाबत बोलताना ‘या आम आदमी क्लिनिकमध्ये आम्ही रुग्णांची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने साठवून ठेवतो. यामुळे प्राणघातक आजारांविरोधात लढण्यास मदत होते,’ असेही मान यांनी सांगितले.
हेही वाचा >> गेल्या दोन दशकांच्या तुलनेत २०२२ मध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा, तब्बल १६५ जणांना मृत्यूदंड!
दरम्यान, यावेळी मान यांनी याआधीच्या सरकारवर टीका केली. मागील सरकारने फक्त जनतेला लुटण्याचे काम केले. त्या लोकांनी सरकारच्या तिजोरीतील पैसे लुटले, असा आरोपही त्यांनी केला.