सध्या पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा मुद्दा चांगलाच चर्चेत येत आहे. तर, आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पार्टी हायकमांडून या कलहावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंजाब कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षाचा नेत्या प्रियंका गांधी यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याबाबत सिद्धू यांनी स्वतः ट्वीट करुन माहिती दिली.
आधी नवजोतसिंग सिद्धू यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रियंका गांधी राहुल गांधींच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी राहुल यांच्याशी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा केल्याचा अंदाज लावल्या जात आहे. त्यानंतर घरी परतल्यावर प्रियंका गांधी यांनी पुन्हा नवज्योतसिंग सिद्धू यांची भेट घेतीली. यापूर्वीचं सिद्धू मंगळवारीच कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे वृत्त होते. पण त्यांची भेट बैठक होऊ शकली नाही.
दिल्ली: पंजाब कांग्रेस नेता नवजोत सिंह सिद्धू ने आज पार्टी नेता प्रियंका गांधी वाड्रा से उनके आवास पर मुलाकात की। pic.twitter.com/K4IHFTZbBP
— ANI_HindiNews (@AHindinews) June 30, 2021
यापुर्वी, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी देखील आमदारांशी चर्चा केली होती. तसेच काँग्रेसमधील गटबाजी संपवण्याच्या उद्देशाने अ.भा. काँग्रेस समितीतर्फे स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यांच्या समितीने तिचा अहवाल पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना सादर केला होता.
उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धू यांच्या नावाची चर्चा
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि माजी खासदार जे.पी. अगरवाल यांचा समावेश होता. सुधारित पक्ष संघटनेत समाजातील सर्व स्तर, जाती आणि धर्म यांना सामावून घेण्याची शिफारस त्यांनी केली.
वरच्या स्तरावर कुठलेही मोठे बदल सुचवण्यात आलेले नसले, तरी नवज्योतिसिंग सिद्धू यांना नव्या रचनेत ‘योग्यप्रकारे सामावून घेतले जावे’ असे समितीने म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धू यांच्या नावाची चर्चा असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबतचा निर्णय श्रीमती गांधी घेणार आहेत.
पंजाबमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीने यापूर्वी राज्यातील अनेक नेत्यांशी विचारविनिमय केला.