पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत असून आत्तापासूनच प्रचारसभांमुळे वातावरण तापू लागलं आहे. पंजाबमध्ये प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या आम आदमी पक्षानं प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. पंजाब काँग्रेसमध्ये आधीच सुरू असलेली सुंदोपसुंदी विरोधकांच्या पथ्यावरच पडली असून त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतच कोलीत आल्याचं बोललं जात आहे. एकीकडे पंजाब काँग्रेसमधल्या वादांचं इंधन विरोधकांच्या हाती असताना दुसरीकडे चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर देखील आपकडून सातत्याने टीका केली जात आहे. मुक्तसर भागामध्ये एका प्रचारसभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका विधानाची खिल्ली उडवत खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपनं देखील ही व्हिडीओ क्लिप आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

“याहून मोठं नौटंकी सरकार पाहिलं नाही”

“जेव्हा काँग्रेसला वाटलं की कॅप्टन साहेबांकडून पराभूत होऊ, तेव्हा त्यांनी तीन महिन्यांपूर्वी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून टाकलं. चन्नीसाहेब देखील रोज नवनव्या घोषणा करत असतात. पण एक गोष्ट नक्की आहे. याहून मोठं नोटंकी सरकार भारतात आजपर्यंत पाहिलं नाही”, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका मुलाखतीचा उल्लेख केला. “काही दिवसांपूर्वी चरणजीत सिंग चन्नी यांची एक मुलाखत मी टीव्हीवर पाहात होतो. ते म्हणत होते मी तर २४ तास जनतेच्या भेटीगाठी घेत असतो. दिवसभर माझ्या घरी लोकं बसलेले असतात. ड्रॉइंग रुम, व्हरांड्यात लोकं बसलेले असतात. मी बाथरूममध्ये जातो तर तिथेही लोकं येत असतात. तिथेही मी लोकांना भेटत असतो. मला वाटतं जगाच्या इतिहासातले हे पहिलेच मुख्यमंत्री असतील, जे बाथरूममध्ये लोकांना भेटतात”, असं म्हणत त्यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला.

एनआरआय आणि चरणजीत सिंग चन्नी!

“मुलाखतीत त्यांना विचारलं, एनआरआय मुद्द्यावर सध्या काय चाललंय. तर ते म्हणतात मी स्वत:च एनआरआय आहे. आधी मी गावात राहात होतो. आता मी शहरात आलो, तर गावातली मंडळी मला एनआरआय म्हणतात. त्यामुळे लोकांनी आता त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे”, असं केजरीवाल म्हणाले.