पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कारागृहातील व्हीआयपी संस्कृतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कारागृहातील सर्व व्हीआयपी खोल्या कारागृह व्यवस्थापन ब्लॉकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कारागृहात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

पंजाबी गायकांना कडक इशारा

यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना कडक इशारा दिला होता. कोणत्याही गाण्यात बंदूक संस्कृती आणि गुंड संस्कृती स्वीकारली जात नाही, असे ते म्हणाले होते. तर दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यानच जाखड आणि काँग्रेसमध्ये पक्षात मतभेद निर्माण झाले होते. अखेर जाखड यांनी फेसबुक लाईव्ह करत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. त्यांनी पक्षाला गुडबाय म्हणत, अशा पद्धतीने चिंतन शिबिर आयोजित करून काहीही होणार नसल्याचा सल्ला दिला आहे.

पंजामध्ये पहिल्यांदाच ‘आप’चे सरकार

 पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री बनले आहेत. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही बड्या पक्षांना नाकारत पंजाबच्या जनतेनं दिल्लीत सत्तेत असणाऱ्या आपच्या हाती सत्ता सोपवली. दरम्यान, याआधी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला अंतर्गत कलहाचा फटका बसला. नवज्योतसिंग सिद्धू, चरणजितसिंग चन्नी यांच्यासारख्या बलशाली नेत्यांना परावभावाला सामोरे जावे लागले. तर आप पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला.

Story img Loader