खलिस्तानी समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’चा सर्वेसर्वा अमृतपाल सिंग अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही आहे. त्यातच अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. किरणदीप कौर, असं अमृतपाल सिंगच्या पत्नीचं नाव आहे. किरणदीप लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पंजाब पोलीस ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंगचा १८ मार्चपासून शोध घेत आहे. पण, अमृतपाल सिंगचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागला नाही. पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांना अटक केली आहे. तर, पोलीस अमृतपाल सिंगचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही चौकशी करत आहे. त्यातच आता पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

अमृतपाल सिंगने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनमधील रहिवाशी असलेल्या किरणदीप कौर बरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर किरणदीप कौर अमृतपालच्या जल्लूपुर या गावात राहत आहे. किरणदीपचे कुटुंबीय मूळचे जालंदरमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.

Story img Loader