पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी उशिरा अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. पंजाबमधील ईडी अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर हनीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली.

गेल्या महिन्यात, ईडीने पंजाबमधील मोहाली, लुधियाना, रूपनगर, फतेहगढ साहिब, पठाणकोट येथे हनी आणि इतरांच्या निवासस्थानी झडती घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या झडतीनंतर १० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, २१ लाख रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू सापडल्या, त्या ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १० कोटींपैकी ७.९ कोटी रुपये भूपिंदरसिंग हनीच्या घरातून जप्त करण्यात आले, तर अन्य संशयित संदीप सिंगच्या घरातून २ कोटी रुपये जप्त करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात असे समोर आले आहे की भूपिंदर सिंग, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. अवैध वाळू उत्खनन रॅकेटच्या आसपास मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिघांची चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून पैसे उकळण्यासाठी आणि अवैध वाळू उत्खनन करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कंपनीची स्थापना ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर, कुदरतदीप सिंह यांच्याविरुद्ध अवैध वाळू उत्खनन प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. वाळूच्या खाणीचे कंत्राट मिळवण्यासाठी काळा पैसा गुंतवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. कंपनी छोटी असल्याने त्या कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट मिळण्याची शक्यता नाही.

Story img Loader