उन्हाची काहिली शमविण्यासाठी अनेक नागरिक हातगाडय़ांवरील लिंबू सरबत, लिंबू पाणी पिताना दिसतात. मात्र लिंबाचे भाव गगनाला भिडल्याने हातगाडीवरील थंड पेयांतून लिंबू सरबत जणू हद्दपारच झाले आहे. जिथे आहे, तिथे प्रचंड महाग असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. असं असताना पंजाबमध्ये लिंबू घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी कपूरथला मॉडर्न जेलचे अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृह मंत्री हरजोत बैस यांच्या आदेशानुसार कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण ५० किलो लिंबाच्या खरेदीशी संबंधित आहे. कारागृहातील लिंबू घोटाळ्यामुळे तुरुंगमंत्री हरजोत बैंस यांच्या आदेशानुसार एडीजीपी कारागृह वरिंदर कुमार यांनी गुरनाम लाल यांना निलंबित केले आहे. कारागृह अधीक्षकांनी रेशन खरेदीमध्ये ५० किलो लिंबू दाखवले होते, तेव्हा बाजारात लिंबाचा भाव २०० रुपयांपेक्षा जास्त होता. मात्र, त्या कैद्यांनाही हे लिंबू मिळाले नाहीत.
चौकशीसाठी समिती पोहोचल्यावर त्याचं बिंग फुटलं. त्यावेळी कैद्यांनी लिंबू मिळत नसल्याचे सांगितले. देशात लिंबूचे भाव गगनाला भिडलेले असताना १५ ते ३० एप्रिलदरम्यान लिंबू खरेदी दाखवण्यात आली. या प्रकरणातील तपासादरम्यान गैरव्यवहारासह अनेक गैरप्रकारही समोर आले आहेत. पीठातही गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
लिंबू घोटाळ्याप्रकरणी कारागृह अधीक्षक निलंबित, प्रकरण जाणून घ्या
लिंबाचे भाव गगनाला भिडल्याने हातगाडीवरील थंड पेयांतून लिंबू सरबत जणू हद्दपारच झाले आहे. जिथे आहे, तिथे प्रचंड महाग असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2022 at 13:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab prison superintendent suspended over lemon scam rmt