पाकिस्तानमधील पंजाब या प्रांतात महिला आणि मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन येथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पाकिस्तान देशातील माध्यमांनी तसे वृत्त दिले आहे.

पंजाब प्रांताचे गृहमंत्री अत्ता तरार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे येथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, असे तरार यांनी सांगितले. “पंजाब प्रांतामध्ये रोजच चार ते पाच बलात्काराच्या घटना घडत आहेत. याच कारणामुळे लैंगिक छळ, अत्याचाराच्या या घटनांना थांबवण्यासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे,” असे तरार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार का?” पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया; होकारही नाही आणि…

तसेच, मंत्र्यांचा सामावेश असलेल्या बलात्कार विरोधी आणि कायदा व सुव्यवस्था असेलेल्या समितीसमोर या घटनांचे पुनरावलोकन केले जाईल. अशा घटनांना थांबवण्यासाठी शिक्षक, वकील, मानवाधिकार संघटना यांच्याकडूनदेखील मदत घेतली जाईल असे मंत्री अत्ता तरार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

यावेळी तरार यांनी पालकांनादेखील आपल्या पाल्यांना सुरक्षाविषयी माहिती देण्याचे आवाहन केले. “पालकांनी आपल्या पाल्यांना सुरक्षेचे महत्त्व समजून सांगावे. तसेच तरुणांना घरी एकटे सोडून नये. बलात्कारविरोधी मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आलं आहे. शाळेमध्ये लैंगिक छळाबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले जाईल,” असे तरार म्हणाले.

Story img Loader