पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंग सोमवारी शहीद झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये बलजीत सिंग जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुदासपूरमधील पोलीस ठाण्यात दहशतवादी लपले असून, पंजाब पोलीसांचे विशेष दल आणि निमलष्करी दलाच्या कमांडोंसोबत त्यांची चकमक सुरू आहे. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पोलीसांसोबत त्यांची चकमक उडाली होती. याच चकमकीवेळी बलजीत सिंग यांनाही गोळी लागली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधीक्षक शहीद
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंग सोमवारी शहीद झाले.
First published on: 27-07-2015 at 01:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab terror attack police sp baljeet singh killed in the attack