पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंग सोमवारी शहीद झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये बलजीत सिंग जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुदासपूरमधील पोलीस ठाण्यात दहशतवादी लपले असून, पंजाब पोलीसांचे विशेष दल आणि निमलष्करी दलाच्या कमांडोंसोबत त्यांची चकमक सुरू आहे. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पोलीसांसोबत त्यांची चकमक उडाली होती. याच चकमकीवेळी बलजीत सिंग यांनाही गोळी लागली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा