Singer Daler Mehndi 2 Years Jail : पटियाला न्यायालयाने गुरुवारी पंजाबी गायक दलेर मेहेंदी यांना २००३ च्या एका मानवी तस्करी प्रकरणात दोषी मानत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच मेहेंदी यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर २००३ मध्ये मावनी तस्करी केल्याचा आरोप होता. 2018 मध्ये न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने दोन्ही भावांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाविरोधात दोघांनी पटियाला न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अखेर या प्रकणात पटियाला न्यायालयाने मेहेंदी यांना दोषी मानत दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवली आणि त्यांना अटक करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – “ज्यांना एकनाथ शिंदेंचा फोन आला…”, मंत्रीपदाबाबत बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचं सूचक विधान!
२००३ मध्ये दाखल एका एफआयआर नुसार, दलेर मेहेंदी यांनी करिश्मा कपूर आणि तिची आई बबिता यांच्या सोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाताना गुजरातमधील तीन मुलींना अमेरिकेत सोडले होते. तसेच ऑक्टोबर १९९९ मध्ये जुही चावला, रवीना टंडन आणि जावेद जाफरी यांच्यासोबत जाताना न्यु जर्सी येथे ३ मुलांना बेकायदेशीर सोडले होते.
१९ सप्टेंबर २००३ रोजी बक्षीश सिंग या व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर पटियाला पोलिसांनी दलेर आणि शमशेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यासोबतच आणखी ३५ जणांनी मेहेंदी बंधूंविरुद्ध फसवणुकीच्या तक्रारी दिल्या होत्या.
हेही वाचा – असंसदीय शब्दांच्या यादीवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “हा नवीन भारताचा…”