सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या हत्याकांडामागे बिश्नोई गँग आहे ही बाब समोर आली होती. आता कुख्यात गँगस्टर सतविंदर सिंह उर्फ गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाची हत्या का केली ते सांगितलं आहे. माझ्याच लोकांनी सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या केली. त्याला खूप गर्व झाला होता आणि त्याला धडा शिकवणं आवश्यक होतं त्यामुळे त्याला मारल्याचं असं गोल्डी ब्रारने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे गोल्डी ब्रारने ?

“सिद्धू मुसेवाला याला आम्ही ठार केलं यामागे फक्त एक कारण नाही. या हत्येमागे अनेक कारणं आहेत. सिद्धू मुसेवाला हा अत्यंत अहंकारी होता, तो माज करत होता. सिद्धू मुसेवालाकडे गरजेपेक्षा जास्त पैसा होता. त्याच्याकडे राजकीय ताकदही होती आणि पोलिसांची सुरक्षाही अकारण जास्त होती. या सगळ्याचा चुकीचा वापर सिद्धू मुसेवाला करत होता. अशात त्याला धडा शिकवणं खूप आवश्यक झालं होतं. त्यामुळेच त्याला ठार केलं” असं गोल्डी ब्रारने सांगितलं आहे. आज तकशी बोलताना गोल्डी ब्रारने हा खुलासा केल आहे.

गोल्डी ब्रारने आणखी काय म्हटलं आहे?

मुसेवालाने अशा चुका केल्या होत्या ज्यांना माफी देणं शक्य नव्हतं. त्याला शिक्षा देणं आवश्यक होतं त्यामुळेच माझ्या गँगने ते केलं. गोल्डी ब्रारचं हे म्हणणंही होतं की सरकार न्याय देत नसेल, कोट्यवधी रुपये महिन्याला कमवणाऱ्या या श्रीमंत गायकासह एसएसपी, डीजीपी यांची उठबस असेल. याचे हात वरपर्यंत पोहचले असतील तर कोर्टात जाऊन काय घडलं असतं? त्यामुळेच आम्ही त्याला ठार केलं. यामागे एक कारण विचारलं तर काहीही नाही पण अनेक कारणं आहेत.

गोल्डी ब्रार हे देखील म्हणाला की मुसेवाला कायमच पोलीस अधिकाऱ्यांसह फिरायचा. माझा भाऊ विक्की मिडुखेडा याची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्यात मुसेवालाचं नाव समोर येत होतं. मात्र पोलिसांनी काहीही केलं नाही. काँग्रेसच्या सरकारमध्ये त्याची उठबस मुख्यमंत्र्यांसहही होती. मुसेवाला डीजीपींच्या कारमध्ये बसायचा. दारु पिऊन फिरत बसायचा पण पोलिसांनी काहीही केलं नाही त्यामुळे आम्ही त्याला ठार केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjabi singer siddhu musewala murder case goldi brar revealed the reason behind it scj