रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी युद्धाला विरोध करत रशियावर निर्बंध लादले आहेत. परंतु तरीही रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले. दरम्यान, या निर्बंधांवर प्रतिक्रिया देत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इशारा दिला आहे. पाश्चात्य देशांकडून त्यांच्या देशावर लादण्यात आलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहे, असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन यांनी शनिवारी मॉस्कोजवळ फ्लाइट अटेंडंटच्या एका गटाला सांगितले की, “हे जे निर्बंध लादले जात आहेत, ते युद्ध घोषित करण्यासारखे आहेत.”

Ukraine War: “आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन स्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याचे युरोप आणि जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. नाटोने नो-फ्लाय झोनची युक्रेनची राजधानी किव्हची विनंती नाकारली आहे. कारण असं केल्यास ते रशियाला मोठे युद्ध करण्यास प्रवृत्त करण्यासारखं होईल, असं मत त्यांनी नोंदवलं. ( युद्धासंदर्भातील लाईव्ह घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

Video: युद्धाविरोधात ना’राजीनामा’… एकाच वेळी Live Telecast दरम्यान सर्वांनी सोडली नोकरी

दरम्यान, युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून, पाश्चात्य देशांनी रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर कठोर निर्बंध घातले आहेत. कंपन्यांना रशियामध्ये व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. तसेच परदेशात oligarchs च्या नौका आणि लक्झरी मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

युक्रेनच्या अध्यक्षांची नाटोवर टीका –

युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने शुक्रवारी नकार दिला. याच मुद्द्यावरुन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी एका भवनिक भाषणामध्ये नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर (नाटो) कठोर शब्दात टीका केलीय. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे याच नाटोमध्ये युक्रेनला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर रशियाने आक्षेप घेतला होता, तर युक्रेनने या देशांसोबत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत. मात्र आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोलाच लक्ष्य केलंय.

Ukraine War: आता NATO वरच युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी साधला निशाणा; म्हणाले “यापुढे जे मृत्यू होतील त्यासाठी…”

नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित न केल्याने रशियाला फायदा होणार आहे असा दावा झेलेन्स्की यांनी केलाय. त्याचप्रमाणे नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने युक्रेनवर रशियाकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांमध्ये वाढ होईल अशी भीतीही झेलेन्स्कींनी व्यक्त केलीय.