हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी, ७ ऑक्टोबरला इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. याला इस्रायलकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गाझातील पाणी, वीज, इंधन, गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. अशातच हमासविरोधात जमिनीवरील मोहीम सुरू करण्यासाठी सैन्य तयार असल्याचं इस्रायलच्या लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे २४ तासांत गाझा सोडण्याचे आदेश इस्रायलनं तेथील नागरिकांना दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रालयाच्या इशाऱ्यानंतर ११ लाख नागरिकांना स्थलांतर करावं लागणार आहे. यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “इस्रायलच्या जमिनी मोहिमेमुळे अनेक नागरिक मारले जातील. जे अमान्य आहे,” अशा शब्दांत पुतिन यांनी बजावलं.

हेही : “दहशतवादाच्या व्याख्येवर जगाचं एकमत न होणं…”, इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

“इस्रायलवर अनपेक्षितपणे हल्ला झाला. इस्रायलला आपल्या संरक्षणाचा संपूर्ण अधिकार आहे. पण, आता रक्तपात थांबला पाहिजे. इस्रायलनं गाझावर जमिनीवरील हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.

“नागरिकांचे मृत्यू अमान्य आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे रक्तपात थांबवणे गरजेचं आहे. रशिया सर्वांशी चर्चा करण्यास तयार आहे,” असं आवाहन व्लादिमीर पुतिन यांनी केलं.

हेही वाचा : युद्धासाठी इस्रायलला जबाबदार धरणं हार्वर्डच्या विद्यार्थ्यांना भोवणार? नोकरी न देण्याचा बिल एकमन यांचा इशारा!

दरम्यान, इस्रालयकडून गाझावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये बळींची संख्या १७९९ वर गेल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागानं दिली. यामध्ये ५८३ बालके आणि ३५१ महिलांचा समावेश आहे. तर, ७३८८ नागरिक जखमी झाले आहेत. त्यात १९०१ बालके आणि ११८५ महिलांचा समावेश असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.