युक्रेनमध्ये असलेल्या रशियन नागरिकांचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यात जराही हयगय होऊ दिली जाणार नाही आणि त्यासाठी शक्य त्या ‘सर्व साधनांचा’ वापर करायला रशिया कचरणार नाही, अशी आपली भूमिका रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्पष्ट केली. मात्र त्याच वेळी, युद्ध हा आपल्यासमोरील सर्वात शेवटचा पर्याय असेल, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी हे तातडीने युक्रेनच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे, रशियन फौजांनी आपल्या तळावर परतण्याचे आदेशही पुतिन यांनी दिले.
तत्पूर्वी, युक्रेनच्या मुद्दय़ावरून जगभरातील नेत्यांमध्ये खलबते सुरू झाली. रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्त्वाचा केलेला भंग, संभाव्य युद्धाचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या ऊर्जासाधनांच्या तुटवडय़ाचा धोका, रशियाला प्रत्यक्ष युद्धापासून कसे रोखायचे यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह सर्वच प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांनी पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, सध्या युक्रेनमध्ये सुमारे १६ हजार रशियन सैनिक दाखल झाले असल्याची माहिती युक्रेनतर्फे संयुक्त राष्ट्रांना देण्यात आली.
अशीही पंचाईत, तशीही पंचाईत..
युक्रेनविरोधात युद्ध छेडणाऱ्या रशियावर कठोर आर्थिक र्निबध लादण्याची भाषा पाश्चिमात्य राष्ट्रे करीत असली तरी असे केले तर अमेरिकेतील बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यास रशिया आपली असमर्थता व्यक्त करेल, अशी माहिती पुतिन यांच्या निकटवर्तीयांनी दिली. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे, रशियाचे रुबल हे चलन डॉलर आणि युरोच्या तुलनेत आधीच घसरले आहे.
रशियन सैन्याकडून हवेत गोळीबार
क्रिमियातील बेल्बेक विमानतळावर असलेल्या रशियाच्या सैन्याने, तेथे असणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांच्या संचलनाच्या पाश्र्वभूमीवर, हवेत गोळीबार केला. तसेच, युक्रेनच्या दोन युद्धनौकाही रशियाच्या नौदलाने रोखून धरल्या.
युद्ध अखेरचाच पर्याय!
युक्रेनमध्ये असलेल्या रशियन नागरिकांचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यात जराही हयगय होऊ दिली जाणार नाही आणि त्यासाठी शक्य त्या ‘सर्व साधनांचा’ वापर करायला रशिया कचरणार नाही,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-03-2014 at 12:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Putin military force would be last resort in ukraine