एपी, सोल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील त्यांच्या कृतींना पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभार मानले. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासोबत मंगळवारी शिखर परिषदेसाठी प्योंगयांग येथे जात असताना पुतीन यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील निर्बंधांवर मात करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. पुतिन यांची विधाने उत्तर कोरियाच्या माध्यमांमध्ये दोन दिवसांच्या भेटीसाठी येण्याच्या काही तास आधी प्रसिद्ध झाली आहेत. या दोन्ही देशांनी अमेरिकेशी तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हातमिळवणी केली आहे.

पुतीन २४ वर्षांमध्ये प्रथमच उत्तर कोरियाचा दौरा करणार आहेत. ाुतीन यांनी उत्तर कोरियाचे कौतुक केले. ते म्हणाले की, न्यायासाठी परस्परांचा आदर ठेवून बहुध्रुवीकृत जागतिक व्यवस्थेच्या स्थापनेत अडथळा आणण्यासाठी पाश्चात्य महत्त्वाकांक्षा असलेल्या देशांना विरोध करणे सुरू राहील. रशिया आणि उत्तर कोरिया व्यापार आणि देयक प्रणाली विकसित करतील जी पाश्चिमात्य देशांद्वारे नियंत्रित नसेल आणि संयुक्तपणे देशांवरील निर्बंधांना विरोध करेल, ज्याचे वर्णय त्यांनी ‘एकतर्फी आणि बेकायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय’ असे केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Putin thanks north korea for support in ukraine amy