कतार न्यायालयाने भारतीय नौदलातल्या माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. कतार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात भारताने अर्ज केला होता. जो कतार न्यायालयाने स्वीकारला आहे त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २०२२ मध्ये भारतीय नौदलाचे माजी अधिकारी पुर्णेंदू तिवारी, सुगुनाकर पकाला, अमित नागपाल, संजीव गुप्ता, नवतेज सिंह गिल, बीरेंद्र कुमार वर्मा, सौरभ वसिष्ठ आणि रागेश गोपकुमार यांना अटक करण्यात आली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार या सगळ्यांवर कतारच्या एका गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. नेमके आरोप काय आहेत ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यांचा जामीन अर्ज कतार न्यायालयाने फेटाळला आहे आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केलं आहे की नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना जी शिक्षा सुनावण्यात आली त्याविरोधात आम्ही अर्ज केला आहे आणि कतारच्या न्यायालायने स्वीकारला आहे. आम्ही कतारशी याबाबत बोलणी करतो आहोत असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं. NDTV ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे भारतीय माजी नौसैनिक कोण? ते कतारमध्ये काय करीत होते?

कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या आठ भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

कंपनीच्या जुन्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, कतारच्या (QENF) नौदलाला प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स व देखभाल सेवा देण्याचे काम ही कंपनी करीत होती. मात्र, हे जुने संकेतस्थळ सध्या उपलब्ध नाही. नव्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीत, कंपनीचे नाव दाहरा ग्लोबल असल्याचे नमूद केलेले आहे. पण, आता कंपनीच्या कतारच्या नौदलाशी असलेल्या संबंधाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच सात भारतीय माजी नौसैनिकांच्या पदांबाबतही नव्या संकेतस्थळावर कोणताही उल्लेख नाही.

कतारची गुप्तचर संस्था एसएसबीने या आठ जणांना ३० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. दोहास्थित भारतीय दूतावासास सप्टेंबरमध्ये त्यांच्या अटकेबाबत माहिती मिळाली होती. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारला त्यांना सुखरुप परत आणण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader