पीटीआय, नवी दिल्ली

जागतिक विद्यापीठांच्या ‘क्यूएस’ विषयवार क्रमवारीत ९ भारतीय विद्यापीठे आणि संस्था अव्वल ५० मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत, मात्र या यादीतील काही प्रमुख संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे, ज्यात तीन आआयटी, दोन आयआयएम आणि जेएनयू यांचा समावेश आहे, तर आयआयटी दिल्ली व मुंबईने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठी अनुक्रमे २६ वे आणि २८वे स्थान मिळवत सुधारणा केली आहे.

‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज बाय सब्जेक्ट’च्या १५व्या आवृत्तीनुसार, भारताने विविध विषय आणि विस्तृत शैक्षणिक क्षेत्रांमध्ये पहिल्या ५०मध्ये स्थान मिळवले आहे. भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकी-खनिज आणि खाणकाम, जिथे इंडियन स्कूल ऑफ माइन्स (आयएसएम), धनबाद जागतिक स्तरावर २०व्या क्रमांकावर आहे.

आयआयटी मुंबई व आयआयटी खरगपूर यांना अभियांत्रिकी-खनिज आणि खाणकामासाठी अनुक्रमे २८वे आणि ४५वे स्थान मिळाले आहे. मात्र, दोन्ही संस्थांच्या क्रमवारीत मागील वर्षाच्या तुलनेत घसरण झाली.

आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठी अनुक्रमे २६वे आणि २८वे स्थान मिळवत सुधारणा केली आहे. तसेच, या दोन्ही संस्थांनी अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्येही अव्वल ५०मध्ये स्थान मिळवले आहे.

आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बंगळुरू यांनी व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जागतिक अव्वल ५०मध्ये स्थान कायम ठेवले असले तरी त्यांची क्रमवारी घसरली आहे.

भारत पाचव्या स्थानावर

● क्यूएसच्या निवेदनानुसार, या वर्षाच्या क्रमवारीत एकूण ७९ भारतीय विद्यापीठांचा समावेश आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत १० ने अधिक आहे. यामध्ये एकूण ५३३ नोंदी आहेत, ज्यात ४५४ विशिष्ट विषयांमध्ये आणि ७९ विस्तृत शैक्षणिक क्षेत्रांमध्ये स्थान मिळाले आहे. नवीन ‘क्यूएस’ विषय-विशिष्ट क्रमवारीत नवीन प्रवेशांच्या संख्येनुसार भारत चीन, अमेरिका, यूके आणि कोरियाच्या मागे असून पाचव्या स्थानावर आहे. तसेच, एकूण समाविष्ट झालेल्या संस्थांच्या संख्येनुसार भारत १२ व्या क्रमांकावर आहे.

● आयआयएम अहमदाबादचा क्रमांक २२ वरून २७ वर गेला आहे, तर आयआयएम बंगळुरूचा क्रमांक ३२ वरून ४० वर घसरला आहे. आयआयटी मद्रास (पेट्रोलियम अभियांत्रिकी) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) यांनीही जागतिक अव्वल ५०मध्ये स्थान कायम ठेवले आहे, परंतु त्यांची क्रमवारी काही स्थानांनी घसरली आहे. भारतातील उच्चशिक्षण क्षेत्राच्या सतत वाढणाऱ्या दर्जाचे आणि प्रमाणाचे हे प्रतिबिंब आहे, त्यामुळे देशाच्या शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता व व्याप्ती दोन्ही सुधारत असल्याचे ‘क्यूएस’चे म्हणणे आहे.

Story img Loader