तो त्याच्या स्वत:च्या गुरुत्वामुळे कोसळला असून त्याचा आकार एका लहान शहराएवढा आहे. तो स्वत:भोवती फिरत असून काही रेडिओ लहरी किंवा क्ष-किरण प्रक्षेपित करीत आहे. हा स्पंदक तारा सिंह तारकासमूहात ३५०० प्रकाशवर्षे दूर आहे, तो त्याची अवस्था काही तासांनी सतत बदलत असतो. साधारण ४५ वर्षांपूर्वी स्पंदक ताऱ्यांचा शोध लागलेला असून आता ज्या स्पंदक ताऱ्याची चर्चा आहे तो १९७० मध्ये सापडला होता. तो असा पहिला स्पंदक तारा आहे जो स्थिर अशा रेडिओ लहरी व क्ष-किरण या दोन टोकांच्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहे. ज्या वैज्ञानिकांनी या पीएसआर बी ओ ९४३ प्लस १० या स्पंदक ताऱ्याचा अभ्यास केला आहे, त्यांच्या मते तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो त्याचे वर्तन परिस्थितीनुसार रंग बदलणाऱ्या शॅमेलिऑन सरडय़ासारखे असते. ‘यूएस जर्नल ऑफ सायन्स’ या नियतकालिकात त्याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध होत आहे.
खोडदच्या रेडिओ दुर्बीणीचा वापर
पुण्याजवळ खोडद येथे वाय आकाराच्या तीस महाकाय डिश अँटेनांचा संच असून ती रेडिओ दुर्बीण आहे. या दुर्बिणीबरोबरच नेदरलँड्समधील दोन रेडिओ दुर्बिणी, दोन खगोलशास्त्रीय उपग्रह यांच्या मदतीने या स्पंदक ताऱ्याची निरीक्षणे नोंदवण्यात आली असून, त्यात अमेरिकेतील व्हरमाँट विद्यापीठाच्या जोआना रॅनकीन या सहभागी होत्या. या संशोधनात नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे राहुल बसू यांचाही सहभाग होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण काय पाहतो आहोत हे खरेतर कुणालाच समजत नव्हते, कारण सैद्धान्तिक खगोलभौतिकशास्त्रज्ञांसाठी या स्पंदक ताऱ्याचे वर्तन म्हणजे एक आव्हान आहे. त्याचबरोबर गूढ आहे.
विम हर्मीसन,
अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठ

या ताऱ्याचे वर्तन चमत्कारिक स्वरूपाचे आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय पथकातील संशोधक या नात्याने आम्ही अभ्यास केला आहे.
दीपंजन मित्रा, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स