Queen Elizabeth II funeral: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये अखेरचा निरोप दिला जात आहे. या अंत्यविधी कार्यक्रमाला जगभरातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात येणार आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटनवर तब्बल ७० वर्ष राज्य केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र चार्ल्स तिसरे हे ब्रिटनचे राजे झाले आहेत.

विश्लेषण: राणीनंतरचा ब्रिटन..राष्ट्रगीतापासून राष्ट्रध्वजापर्यंत बरंच काही बदलणार, नेमके काय असतील हे बदल?

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु अंत्यविधीसाठी लंडनमध्ये उपस्थित आहेत. त्यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते लंडनमध्ये दाखल झाले आहेत. महाराणीच्या अंत्यविधीसाठी ५०० राजघराण्यांचे सदस्य, राष्ट्रांचे प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले आहे.

महात्मा गांधींनी दिलेली ‘ती’ भेटवस्तू राणी एलिझाबेथ यांनी आयुष्यभर सांभाळली, मोदी भेटीतही झाला होता उल्लेख

(व्हिडीओ सौजन्य-रॉयटर्स)

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबरला स्कॉटलँडमध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आले होते. लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाराणीच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी आठ किलोमीटरपर्यंत रांग लावली होती.

Story img Loader