एक्स्प्रेस वृत्तसेवा
नवी दिल्ली : बालविवाह, सती आणि विधवा पुनर्विवाह बंदी यांसारख्या प्रथा आणि महिलांमधील निरक्षरता यांचा इस्लामी आक्रमणामुळे भारतीय समाजात शिरकाव झाला, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी रविवारी केले.
बाराव्या शतकापूर्वी महिला पुरेशा मुक्त होत्या आणि त्यांनी भारतीय समाजात महत्त्वाचे योगदान दिले, असे ‘नारी शक्ती संगम’च्या विद्यमाने दिल्ली विद्यापीठात ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर बोलताना गोपाल यांनी सांगितले. पाश्चिमात्य संस्कृतीबाबत त्यांनी खबरदारीचा इशारा दिला आणि स्वयंपाकघर सांभाळणे हे शास्त्रज्ञ बनण्याइतकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
‘मध्ययुगाचा विचार करा. तो अतिशय कठीण काळ होता. संपूर्ण देश दमनाशी लढत होता. मंदिरे तोडण्यात आली, विद्यापीठे नष्ट करण्यात आली आणि महिला धोक्यात होत्या. लाखो महिलांचे अपहरण करून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये विक्री करण्यात आली. अहमद शाह अब्दाली, मोहम्मद घोरी आणि महमूद गझनी या सर्वानी महिलांना येथून नेऊन विकले होते.. तो प्रचंड अपमानाचा काळ होता. त्यामुळे, आमच्या महिलांचे संरक्षण करण्यासाठी आमच्या समाजाने त्यांच्यावर अनेक बंधने घातली,’ असे गोपाल म्हणाले.
हेही वाचा >>>मागण्या मान्य झाल्याशिवाय धान्य करार नाही ; रशिया
गोपाल म्हणाले, राम व कृष्ण यांचे ठराविक वय गाठल्यानंतर लग्न झाले. मात्र इस्लामी अतिक्रमकांमुळे बालविवाह सुरू झाले. त्यापूर्वी भारतात ‘सती’ची प्रथा नव्हती. त्याचे एखाद-दुसरे उदाहरण असेल, पण इस्लामी आक्रमक आल्यानंतर महिलांनी मोठय़ा संख्येत ‘सती’, ‘जोहार’ यांचा अवलंब करणे सुरू केले. पूर्वी विधवांच्या पुनर्विवाहावरही निर्बंध नव्हते.
‘‘अशा प्रकारे महिला हळूहळू अशिक्षित बनल्या आणि बालविवाहासारख्या प्रथा आल्या. विधवांचे पुनर्विवाह थांबवण्यात आले आणि महिलांवर अनेक बंधने घालण्यात आली. हा समाजाच्या अधोगतीचा कालखंड होता. हे निर्बंध म्हणजे आमच्या समाजाचे नियम नव्हते, तर ‘आकस्मिक परिस्थितीला’ तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजना होत्या,’’ असे प्रतिपादन कृष्ण गोपाल यांनी केले.