फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला हजर राहण्यासाठी भारत भेटीवर येणार असून त्या वेळी भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ राफेल लढाऊ विमानांबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.
या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तीन वर्षांत पहिले लढाऊ विमान भारताला पुरविण्यात येणार असल्याचे कराराच्या मसुद्यात म्हटले आहे. तर करारावर स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलासाठी ३६ लढाऊ विमाने सात वर्षांच्या कालावधीत पुरविण्यात येणार आहेत.
सध्या उपलब्ध असलेली लढाऊ विमाने पाकिस्तान आणि चीनचा सामना करण्यासाठी पुरेशी नाहीत, त्यासाठी किमान ४४ विमानांची गरज आहे. त्यामुळे सदर ३६ विमाने मिळाल्यावर हवाई दलाचे सामथ्र्य वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्यात पॅरिसला गेले असताना फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने घेण्याच्या प्रस्तावाची घोषणा करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा