|| सुशांत सिंग

तत्कालीन फ्रान्स अध्यक्षांच्या सहचारिणीच्या चित्रपटाची रिलायन्सकडून सहनिर्मिती

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद हे राफेल सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या आणि प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येण्याच्या दोन दिवस आधी त्यांच्या सहचारिणीच्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव रिलायन्स एन्टरटेन्मेंटने स्वीकारल्याचे उघड झाले आहे. यामुळे राफेल करारातली एक ‘रूपेरी’ कडाही प्रकाशमान झाली आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्सला डावलून ज्यांना विमाननिर्मितीचा कोणताही अनुभव नाही अशा ‘रिलायन्स डिफेन्स’ या नव्या कंपनीला राफेल करारात का सहभागी करून घेतले गेले, या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या रान उठवले आहे. या पाश्र्वभूमीवर ही बाजू उघड झाली आहे.

२४ जानेवारी २०१६ रोजी रिलायन्स एन्टरटेन्मेंट या अनिल अंबानी यांच्या कंपनीने ज्युली गइए  यांच्या ‘रू इंटरनॅशनल’ या चित्रसंस्थेच्या एका चित्रपटाची सहनिर्मिती आपण करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर दोनच दिवसात म्हणजेच २६ जानेवारी २०१६ रोजी ओलाँद यांनी भारतासोबत ५९ हजार कोटी रुपयांच्या राफेल विमान विक्रीचा सामंजस्य करार केला. ३६ विमानांचा हा करार ‘दॅसॉल्त रिलायन्स एरोस्पेस लि.’ (डीआरएएल) या कंपनीच्या माध्यमातून केला गेला. या मध्यस्थ कंपनीत अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचा वाटा ५१ टक्के तर फ्रान्सच्या ‘दॅसॉल्त एव्हिएशन’ या राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा वाटा ४९ टक्के आहे.

ओलाँद यांच्या दौऱ्यातच राफेल करारावर स्वाक्षऱ्या अपेक्षित होत्या. मात्र काही ‘आर्थिक मुद्दय़ां’मुळे केवळ सामंजस्य करार झाला. हा दोन सरकारांमधील करार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्ष करार सप्टेंबर २०१६मध्ये केला गेला.

या सामंजस्य कराराआधी रिलायन्स एन्टरटेन्मेंटने ज्युली गइए या फ्रेंच अभिनेत्रीच्या ‘तू ला-ओ’ (म्हणजे ‘सर्वोच्च शिखरावर’) या चित्रपटाची सहनिर्मिती करीत असल्याचे जाहीर केले. ज्युली ही ओलाँद यांची सहचारिणी आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१७मध्ये नागपूर येथे ‘दॅसॉल्त एव्हिएशन’चे अध्यक्ष एरिक तेपेएर आणि अनिल अंबानी यांनी ‘डीआरएएल’ कंपनीचा शिलान्यास झाला. त्यावेळी फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरोस पार्ली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते.

यानंतर दोनच महिन्यात म्हणजे २० डिसेंबर २०१७ रोजी ‘तू ला-ओ’ हा चित्रपट फ्रान्समध्ये प्रदर्शित झाला.

ओलाँद हे मे २०१२ ते मे २०१७ अशी पाच वर्षे फ्रान्सचे अध्यक्ष होते. ज्युलीबरोबरचे त्यांचे संबंध त्यांनी २०१४मध्ये उघड केले. २३ सप्टेंबर २०१६ रोजी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी नवी दिल्लीत राफेल विमान करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दहाच दिवसांत म्हणजे ऑक्टोबर २०१६मध्ये दॅसॉल्त आणि रिलायन्स हे राफेल विमान करार पूर्णत्वास नेणाऱ्या मध्यस्थ कंपनीचे वाटेकरी असल्याची अधिकृत घोषणा झाली.

प्रतिसाद शून्य!

‘इंडियन एक्स्प्रेस’ने रू इंटरनॅशनल या चित्रपटसंस्थेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी ईमेलद्वारे प्रश्न पाठवण्यास सांगितले. त्या प्रश्नांना अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. त्यावर पुन्हा विचारणा केली असता, या प्रश्नांना उत्तरे दिली जातील, अशी अपेक्षा करू नका, असे सांगण्यात आले! रिलायन्स एन्टरटेन्मेंटकडेही एसएमएस, प्रत्यक्ष दूरध्वनी आणि ईमेलद्वारे विचारणा केली गेली. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

Story img Loader