Raghav Chadha changes Twitter bio: आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना शुक्रवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपचे खासदार राघव चढ्ढा निलंबित असणार आहेत. राघव चढ्ढा यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप आहे. राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ज्यावरुन त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनानंतर, आता राघव चढ्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांचे बायो बदलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलंबित खासदार राघव चढ्ढांनी बदलला बायो

राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांचे बायो बदलून निलंबित खासदार केले आहे. याआधी राघव चढ्ढा यांच्या बायोमध्ये फक्त खासदार लिहिले होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी राघव चढ्ढा यांना सभागृहातून निलंबित केले.

(हे ही वाचा: Raghav Chadha Suspended : आप खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, बनावट सह्यांच्या प्रकरणात कारवाई)

खासदार राघव चड्डा राज्यसभेतून निलंबित! कारण काय ?

दिल्ली सेवा विधेयक ७ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर झाले. सभागृहाच्या कामकाजादरम्यान आप खासदार राघव चढ्ढा यांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव पाठवला. या समितीसाठी त्यांनी काही खासदारांची नावेही सुचवली. मात्र, प्रस्तावित सदस्यांपैकी ५ खासदारांनी राघव चढ्ढा यांनी त्यांच्या संमतीशिवाय त्यांची नावे घेतल्याचे सांगितले, जे योग्य नाही. यावर सर्व खासदारांनी आपल्या तक्रारीही मांडल्या. विरोध करणाऱ्यांमध्ये तीन भाजपा खासदार, एक बीजेडीमधील आहे. याशिवाय अण्णाद्रुमूकच्याही खासदाराचा समावेश आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीची मागणी केली होती. 

बनावट स्वाक्षरी प्रकरण

सभागृहाच्या कामकाजादरम्यान राघव चढ्ढा यांनी दिलेल्या प्रस्तावावर खासदारांच्या सह्या असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, ५ खासदारांनी या प्रस्तावावर सही केली नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सभागृहाच्या विशेषाधिकार समितीने राघव चढ्ढा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दुसरीकडे राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ज्या कागदावर त्यांनी बनावट स्वाक्षरी केली आहे, तो कागद घेऊन या, असे आव्हान दिले.