Raghuram Rajan in Bharat Jodo Yatra: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. राजस्थानमध्ये राहुल गांधींची ही यात्रा पोहोचलेली असता राजन काही अंतर या यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालले. राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील भदोईमधून राहुल गांधींच्या आजच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली.

“भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालताना आरबीआय़चे माजी गव्हर्नर रघुराम राजन”, अशा कॅप्शनसहीत राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. “नफरत के खिलाफ देश जोड़ने के लिए खड़े होने वालों की बढ़ती संख्या बताती है कि- हम होंगे कामयाब,” असंही हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

रघुराम राजन यांनी यापूर्वी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांवर टीका केलेली आहे. भारताचा विकास हा मुक्त लोकशाहीला अधिक पाठबळ देण्यामध्ये आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संस्थांना सामर्थ्यवान बनवण्यामध्ये आहे, असं राजन सांगतात. राजन हे मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर उघडपणे टीका करणाऱ्या प्रमुख तज्ज्ञांपैकी एक आहेत. “आर्थिक विकास मंदावण्यासाठी हा राजकीय आणि सामाजिक अजेंडा” कारणीभूत ठरला असं राजन यांनी यापूर्वी म्हटलं आहे. यावरुन भारतीय जनता पार्टीने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवलेली.

रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेला हजेरी लावणं हे अनेकांना आश्चर्याचकित करणारं ठरलं नाही. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस समविचारी व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील समविचारी व्यक्तींना ‘देश एकत्र करण्यासाठी’ एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

Story img Loader