पीटीआय, गुवाहाटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आसामचे भाजप सरकार नागरिकांना ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सामील होऊ नये, यासाठी धमकावत आहे. तसेच यात्रा मार्गावर कार्यक्रमांना परवानगी नाकारत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. विश्वनाथ जिल्ह्याचे मुख्यालय विश्वनाथ चारियाली येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, जनता भाजपला घाबरत नाही. आगामी निवडणुकीत पक्ष भाजपविरोधात मोठय़ा फरकाने विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.

राहुल म्हणाले, ‘‘आम्ही या यात्रेत लांबलचक भाषणे देत नाही. आम्ही दररोज सात-आठ तास प्रवास करतो, तुमच्या समस्या ऐकतो आणि तुमचे प्रश्न मांडणे हाच आमचा उद्देश आहे. मात्र, लोकांना यात्रेत सहभागी न होण्यासाठी धमकावले जात असून, राज्यात काँग्रेसचे झेंडे आणि फलकांचीही मोडतोड केली जात आहे. आसाम सरकारला वाटते की, ते जनतेवर दडपशाही करू शकतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की ही केवळ राहुल गांधींची यात्रा नसून, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठीची ही यात्रा आहे. रविवारी सकाळी ही यात्रा अरुणाचल प्रदेशातून विश्वनाथमार्गे आसाममध्ये पुन्हा दाखल झाली. यावेळी राहुल यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य करून ‘देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री’ असे संबोधले.

हेही वाचा >>>“मी बसमधून उतरलो अन् त्यांनी…”, राहुल गांधींनी सांगितलं भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यावेळी काय घडलं?

राहुल यांनी शंकरदेव जन्मस्थळ भेट टाळावी- सरमा

‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळय़ादरम्यान बारदोवा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानाला भेट देणे टाळावे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले, की प्रभू रामचंद्र आणि आसाममधील मध्ययुगीन वैष्णव संत यांच्यात कोणतीही स्पर्धा असू शकत नाही. राहुल अनावश्यक स्पर्धा निर्माण करत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळय़ानंतरही राहुल यांना येथे जाता येईल. ही स्पर्धा आसामसाठी दु:खद ठरेल, असे ते म्हणाले. २२ जानेवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान अल्पसंख्याक बहुल भागातील संवेदनशील मार्गावर ‘कमांडो’ तैनात केले जातील, असेही त्यांनी सांगितले.