पीटीआय, कोझिकोड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्याोगपती गौतम अदानी यांच्याबद्दल ‘पक्षपाती’ असल्याचा आणि वायनाड भूस्खलनग्रस्तांना योग्य मदत न देऊन त्यांच्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांची बहीण आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्या विजयानंतर राहुल गांधी प्रथमच केरळमध्ये आले होते.

सरकार स्वतचीच चौकशी कशी करू शकते?

परराष्ट्र मंत्रालयाच्या अदानी समूहाच्या अमेरिकेच्या चौकशीचा भाग नसल्याच्या भारत सरकारच्या विधानाचा काँग्रेसने शनिवारी खरपूस शब्दांत समाचार घेतला आणि केंद्र सरकार आपल्याच विरोधातील चौकशीचा भाग कसा काय असू शकतो, असा प्रश्न पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी उपस्थित केला.परराष्ट्र मंत्रालयाचे (एमईए) प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या प्रकरणात भारत सरकारला आगाऊ कल्पना देण्यात आली नव्हती असे म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi accuses pm of adani case amy