पीटीआय, हैदराबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘देशातील द्वेषाचे वातावरण संपवण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे आवश्यक आहे,’’ असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले. तेलंगणामधील नामपल्ली येथे एका निवडणूक सभेत बोलताना  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), पंतप्रधान मोदी आणि कट्टरपंथीयांनी देशभर द्वेष पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसने आपल्या ‘भारत जोडो यात्रे’त ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान खुले करण्याचा’ नारा दिला होता, याची आठवण राहुल यांनी यावेळी करून दिली. ‘बीआरएस’, भाजप आणि ‘एआयएमआयएम’ संगनमताने परस्परपूरक काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आपण पंतप्रधान मोदींविरोधात लढत असल्यामुळे आपल्यावर २४ गुन्हे दाखल झाल्याचा दावा करून राहुल म्हणाले, की ‘‘मानहानी प्रकरणात एखाद्या व्यक्तीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी निवासस्थान हिसकावले गेले’’.हा लढा वैचारिक आहे आणि मी त्यात तडजोड करू शकत नाही, असे सांगून राहुल यांनी त्यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. हैदराबादचे खासदार असलेल्या ओवेसींविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत? ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’सारख्या सरकारी तपास यंत्रणा नेहमीच आपला पिच्छा पुरवतात. पण ओवेसी यांच्यावर कोणत्याही यंत्रणेने आतापर्यंत कारवाई केली आहे का? ओवेसींविरुद्ध एकही गुन्हा-खटला दाखल का झालेला नाही? ओवेसी पंतप्रधान मोदींना मदत करतात, हेच या मागचे खरे कारण आहे असे राहुल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi alleges that bjp brs aimim are in collusion amy
Show comments