Rahul Gandhi on Assembly Haryana Election Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. भाजपाने ९० पैकी ४९ जागा जिंकत बहुमताचा टप्पा पार केला आहे. तर, काँग्रेसला राज्यात मोठा फटका बसला आहे. काँग्रेसने राज्यात ३७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. दरम्यान, हरियाणामधील या पराभवानंतर काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसची चिंतन बैठक बोलावली होती. या बैठकीत राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यातील काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक हितांना प्राधान्य दिल्यामुळे आपल्याला हा पराभव पाहावा लागला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा