काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा कायमच होत असते. राहुल गांधींना काही वेळा ट्रोलही करण्यात आलं आहे. अशातच राहुल गांधी यांनी आता लग्न का केलं नाही या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी हे उत्तर दिलं आहे. त्यांना काही विद्यार्थिनींनी लग्नाविषयी प्रश्न विचारला त्यावर राहुल गांधी हसले आणि त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

राहुल गांधींनी काय उत्तर दिलं?

राहुल गांधी यांना विद्यार्थिनी म्हणाल्या, तुम्ही इतके स्मार्ट आणि गुड लुकिंग आहात अजून लग्न का केलं नाही? त्यावर राहुल गांधी म्हणाले, “मी माझ्या कामात आणि काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत मी अडकून गेलो आहे. त्या सगळ्यात गुरफटलो म्हणून मी लग्न केलं नाही.” असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं आहे.

Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Ajit Pawar
Ajit Pawar On Loan Waiver : अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही…”
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन जेवायला उत्तरेकडे तोंड करून का बसतात? हरिवंशराय बच्चन यांनी पुस्तकात लिहिलेली आठवण, म्हणालेले…

खतम, टाटा, बाय बाय वर काय म्हणाले राहुल गांधी?

तुम्ही इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झालेलं तुमचं मीम खतम-टाटा, बाय बाय पाहिलं आहे? यावर राहुल गांधींनी “हो” असं उत्तर दिलं. तसंच तु्म्ही याविषयी काय सांगाल? असं विचारलं असता राहुल गांधी म्हणाले “हो, असं कधी कधी म्हणावं लागतं” आणि मग त्यांनी हे तीन शब्द परत म्हणूनही दाखवले ज्यामुळे विद्यार्थिनींमध्ये हशा पिकला.

महाविद्यालयात तुमची क्रश कोण होती? असाही प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हसून “Now You See” इतकंच उत्तर दिलं. तसंच तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत नाही असं विचारलं असता, “कारलं, मटार आणि पालक या तीन भाज्या आवडत नाहीत, बाकी काहीही चालतं” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. तुम्ही चेहऱ्याला क्रीम, फेसवॉश लावता का? असं विचारलं असता राहुल गांधी म्हणाले, “मी चेहऱ्याला फेसवॉश, साबण काहीही लावत नाही. स्वच्छ पाण्याने चेहरा रोज धुतो” विद्यार्थिनींना राहुल गांधींनी दिलेल्या मजेदार उत्तरांची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. News 24 या चॅनलला दिलेल्या या मुलाखतीत राहुल गांधींनी ही उत्तरं दिली आहेत.

Story img Loader