G20 Summit Delhi 2023 : ‘जी-२०’ समूहाची शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबरला दिल्लीत पार पडत आहे. यासाठी ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि अधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. या विदेशी पाहुण्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजघाट आणि परिसरात असलेल्या माकडांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी काही लोकांना तैनात केलं आहे. तसेच, दिल्लीतील मुख्य मार्गावरील अनेक भागांना शेडनेटच्या ( पडदा ) आधारे झाकण्यात आला आहे. पण, भारताचे वास्तव लपवण्याची गरज नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला खडसावलं आहे.

हेही वाचा : G20 Summit: राष्ट्रपतींच्या डिनरला आमंत्रण नसल्याने खरगेंनी मोदी सरकारला सुनावलं; म्हणाले…

‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर राहुल गांधी म्हणाले, “केंद्र सरकार आमचे गरीब लोक आणि प्राण्यांना लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाहुण्यांपासून भारताचे वास्तव लपवण्याची गरज नाही.”

हेही वाचा : जी २० परिषदेतील पंतप्रधानांसमोरील नामफलक सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण वाचा!

दुसरीकडे काँग्रेसच्या ‘एक्स’ अकाउंटवरून मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे. “जी-२० पूर्वी मोदी सरकारने आपलं अपयश लपविण्यासाठी नागरिकांच्या घरावर शेडनेट टाकण्याचं काम केलं आहे. कारण, राजा गरीब लोकांचा द्वेष करतो,” अशी टीका काँग्रेसने मोदी सरकारवर केली आहे.