एका धर्माला दुसऱ्या धर्माविरुद्ध संघर्ष करायला लावून भाजप रक्तरंजित राजकारण खेळत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. येथील जाहीर सभेत त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले.
भ्रष्टाचारविरोधातील विधेयके विरोधकांनी रोखल्याने अध्यादेशाद्वारे ती आणण्याचा काँग्रेसने प्रयत्न केल्याचे सांगतानाच, भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून भाजपवर टीका केली. भाजपला सत्तेशिवाय काहीही दिसत नाही. त्यासाठी जाती, धर्मामध्ये ते भांडणे लावतात. मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात मात्र त्यांनी कधीच लोकायुक्त नेमला नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधातील विधेयक आणण्याबाबत सरकारला विरोधकांनी सरकारला सहकार्य केले नसल्याची टीका राहुल यांनी केली.
भाजपला येडियुरप्पा आणि गुजरातमधील भ्रष्टाचार दिसत नाही अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. केवळ पंतप्रधान करा एवढीच त्यांची घोषणा आहे. गुजरातचा विकास तिथल्या नागरिकांनी कष्टाने केला आहे. संगणक क्रांती राजीव गांधी यांनी आणली. देशात संगणक आणण्यास अटलबिहारी वाजपेयी यांनी विरोध केला होता, अशी टीका राहुल यांनी केली. विरोधकांना विकासाची दृष्टीच नाही, काँग्रेस सामान्य व्यक्तीच्या समस्या जाणतो असे राहुल यांनी सांगत, भाजपचा समाचार घेतला. महिलांच्या सबलीकरणाशिवाय देशाचा विकास होणे कठीण आहे अशी काँग्रसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी काँग्रेसने पुढाकार घेतल्याने सोनिया गांधी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना आपण भेटलो. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्याचबरोबर काँग्रेसचे सरचिटणीस आणि आंध्रप्रभारी दिग्विजय सिंह आपल्या संपर्कात आहेत.
के. चंद्रशेखर राव, अध्यक्ष, तेलंगणा राष्ट्र समिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा