हैदराबाद : तेलंगणातील काही भाजप नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल यांनी शुक्रवारी केला. राहुल यांनी तीन दिवस तेलंगणामध्ये काँग्रेसच्या ‘विजयभेरी’ यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि काही सभा घेतल्या. राज्यातील भाजपचे नेते आधी चित्रपटांमधील नायकांप्रमाणे ऐटीत असत, पण आता त्यांना काँग्रेसमध्ये यायचे आहे असे राहुल म्हणाले. या प्रचार दौऱ्यामध्ये राहुल यांनी सत्ताधारी बीआरएसला विशेष लक्ष्य केले. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला अधिक चांगली किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले. तेलंगणातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना १२ ते १५ हजार किंमत देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. त्याशिवाय, काँग्रेसने हाती घेतलेला जातीनिहाय आरक्षणाचा मुद्दाही राहुल यांनी वारंवार उपस्थित केला. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना केली जाईल या आश्वासनाचा त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये पुनरुच्चार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi claims bjp leaders eager to join congress in telangana zws