प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून हल्लेखोरांनी शिवणकाम व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्यावर चाकू आणि तलवारीने वार केले आहेत. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनीही या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या निर्घृण हत्येनंतर मला धक्का बसला असून गुन्हेगारास लवकरात लकर शिक्षा मिळावी, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सरकारी योजनांची जबाबदारी लवकरच सहकारी बँकांवर; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा

“उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर सुरु असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरविणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. आपल्या सर्वांना सोबत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा, असे माझे आवाहन आहे,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी आज रवाना; जम्मूतील तळावर कडेकोट बंदोबस्त

उदयपूरमध्ये नेमकं काय घडलं?

राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची मंगळावारी (२८ जून) हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन केले जात आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> आसाममध्ये पूरपातळीत घट; पण २१ लाख नागरिक वेढय़ातच; आणखी पाच जणांचा मृत्यू

कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघे जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैयालाल यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका हल्लेखोराचे नाव रियाज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने वार केले आणि दुसऱ्या तरुणाने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण केले, असे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi comment on udaipur kanhailal teli murder said have to defeat hate together prd