काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा लवकरच राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याच्या वृत्तांचा बुधवारी भाजपकडून समाचार घेण्यात आला. राहुल यांचा राज्याभिषेक करून त्यांना पक्षाध्यक्षपदी बसविणे म्हणजे घराणेशाहीच्या राजकारणाचा उत्तम नमुना असल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी मोदींवर टीका करताना त्यांना ‘शहेनशहा’ म्हणून संबोधले होते.
नरेंद्र मोदी शहेनशहांसारखे!
या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसला हे प्रत्युत्तर देण्यात आले. सोनिया गांधी यांच्या ‘शहजाद्या’च्या डोक्यावर पक्षाध्यक्षपदाचा मुकूट ठेवणे, हे ‘शहेशहानियत’चे (घराणेशाहीचे) बोलके उदाहरण असल्याचे भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांनी म्हटले. इतके वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिल्यानंतर आता सोनियांकडून ती खुर्ची राहुल यांना दिली जात आहे. हे लोकशाहीला धरून आहे का?, ही घराणेशाही नव्हे का, असा सवाल पात्रा यांनी विचारला. याशिवाय, केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनीदेखील काँग्रेस हे बुडणारे जहाज असल्याची टीका करताना संपूर्ण देशाला राहुल गांधींची गुणवत्ता माहित असल्याचा खोचक टोला लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा