पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेत बोलताना अनेक शब्दांवर बंदी घालण्यात आली. त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
जुमलाजीवी, हुकूमशहा, शकुनी, जयचंद, विनाश पुरुष, रक्ताची शेती वगैरे शब्द हे असंसदीय आहे. असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. या शब्दांची एक लांबलचक यादी तयार करण्यात आली आहे. संसदेच कामकाज किंवा चर्चेदरम्यान हे शब्द वापरता येणार नाही, असे संसेच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ”हा नवीन भारताचा नवीन शब्दकोष आहे”, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. ”सरकारच्या कामकाजाचे योग्य वर्णन करणाऱ्या शब्दांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – शिवसेना-भाजपाची युती होणार? केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले “पहिला फोन कोणी करायचा यावर…”