देशातील महागाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा आपल्या मित्रांना देशातील संपत्ती फ्री फंड’मध्ये विकत असल्याचा आरोप त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला. तसेच डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधलेल्यांना महागाई कशी दिसेल, असेही ते म्हणाले.
देशा सध्या अमृत महोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. भाजपाने देशात महागाई नाही, असे संसदेत सांगितले. मात्र, डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधलेल्यांना आणि देशाची संपत्ती मित्रांना फ्रि फंडमध्ये विकणाऱ्यांना देशातील महागाई कशी दिसेल?, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
महागाईवरून राहुल गांधी यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहे. ”देश बेरोजगारीच्या महामारीशी झुंज देत आहे. देशातील गरिकांकडे स्थिर उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. परंतु सरकार फक्त नरेंद्र मोदी यांची प्रतिमा चमकविण्यासाठी कोट्यवधी खर्च करत आहे, अशा आरोप त्यांनी केला.
संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने महागाईबाबत सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस खासदारांचे खासदारांचे निलंबन करू आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.