देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या काळात गॅस सिलिंडरच्या किमती 157 टक्क्यांनी वाढल्याचे राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटले. राहुल गांधी महागाईवरून सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत.

राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटले, ”भाजपा सरकारच्या काळात एलपीजीच्या किंमती १५७ टक्कांनी वाढल्या आहेत. तसेच पेट्रोल विक्रमी महाग झाले आहे. गब्बर सिंग टॅक्स आणि बेरोजगारीची सुनामी आहे.”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

”पंतप्रधान मोदी म्हणाले होते की १३३ कोटी भारतीय त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला सांगत आहेत, तुमच्यात हिम्मत असेल तर आम्हाला थांबवा. मात्र, जनता पंतप्रधानांना सांगत आहे, तुम्ही निर्माण केलेले हे अडथळे संपले आहेत, आता थांबा”, असा खोचक टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला आहे.

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 पूर्वीच्या विधानांवरून निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एक पोस्टर शेअर करून लिहिले की, अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन होत असताना हेडलाइन मॅनेज केली जात आहे.

हेही वाचा – “राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असेल”, यशवंत सिन्हा यांची प्रतिक्रिया