नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी म्हणतात की, ते देवाचा अवतार आहेत. कदाचित नोटाबंदीसारखे लोकविरोधी निर्णय घेण्याचा ‘आदेश’ वरून आला असेल. खटाखट-खटाखट आदेश आले असतील, त्याचे मोदींनी पालन केले असेल’, अशी उपहासात्मक टीका गांधी यांनी केली. ‘नीट’ व ‘नेट’ पेपरफुटीवरूनही केंद्र सरकारवर राहुल गांधींनी शरसंधान साधले. ‘नीट’ ही व्यावसायिक नव्हे तर, व्यापारी परीक्षा झाली आहे. गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर श्रीमंतीच्या आधारावर ही व्यवस्था चालते. नीटवद्वारे श्रीमंत विद्यार्थ्यांना वैद्याकीय क्षेत्रात प्रवेश देण्यासाठी निर्माण झालेली ही कोटापद्धती आहे. ७ वर्षांमध्ये ७० वेळा पेपरफुटी झाली. या सगळ्याचा उल्लेख राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नाही’, असे राहुल गांधी म्हणाले.
‘वरून’ खटाखट आदेश आले असतील! लोकसभेत राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी म्हणतात की, ते देवाचा अवतार आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2024 at 07:04 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi criticized the prime minister in the lok sabha amy