केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा करांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार टीका केली आहे. जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भाजपाकडून नष्ट करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी ट्वीटद्वारे केला आहे.
राहुल गांधी यांनी जीएसटी लावण्यात आलेल्या वस्तूंची यादी शेयर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. ”एकीकडे वाढवलेला कर आणि दुसरीकडे बेरोजगारी, जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी नष्ट करायची यावर भाजपाचा हा मास्टरक्लास आहे”, असे ट्वीट त्यांनी केले आहे. तसेच पुन्हा त्यांनी जीएसटीचा उल्लेख ‘गब्बर सिंग टॅक्स’ असा केला आहे.
हेही वाचा – MP Bus Accident : “अपघाताची घटना अतिशय..,” मध्य प्रदेश बस अपघातानंतर नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेने दूध, दही आणि पनीरसारखे पॅक केलेले खाद्यपदार्थ, पॅक केलेले तांदूळ आणि गहू यासारख्या पदार्थांवर पाच टक्के वस्तू व सेवा कर लावला आहे. तसेच बॅंकेच्या चेकवरही १८ टक्के आणि हॉटेल्स रुमवरही कर लावण्यात आला आहे.