लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या भाषणातील काही टिप्पण्ण्या लोकसभाध्यक्षांनी कामकाजाच्या इतिवृत्तातून काढून टाकल्या. त्यावर, काँग्रेसच्या खासदाराने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘मोदीजींच्या जगात सत्य खोडून काढले जाऊ शकते, परंतु प्रत्यक्षात सत्य काढून टाकता येत नाही. मला जे काही म्हणायचे होते ते मी बोललो आणि तेच सत्य आहे. ते त्यांना हवे तितके काढून टाकू शकतात, परंतु सत्याचा विजय होईल’’, असे मत राहुल गांधी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Monsoon rains throughout the country Flood situation in Assam
मोसमी पाऊस संपूर्ण देशात, आसाममध्ये पूरस्थिती; गुजरातच्या अनेक गावांचा संपर्क तुटला
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
Hathras Accident
Hathras Stampede : चेंगराचेंगरीत १२१ जण ठार झाल्यानंतर भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Hathras Stampede What Exactly happened
Hathras Stampede : “गुरुजींची कार मंडपातून निघाली, अन् लोकांनी…”, पीडिताने सांगितली आपबिती; हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?
Insult of Hindu community by Congress Prime Minister Narendra Modi criticized in Lok Sabha
काँग्रेसकडून हिंदू समाजाचा अपमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ठणकावले
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत बोलताना भाजपच्या धर्माधारित राजकारणावर टीका केली. भाजपच्या सदस्यांनी तसेच, अमित शहा यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींची धर्मावर आधारित टिप्पणी इतिवृत्तातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

माफीची मागणी

राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला होता. राहुल गांधींचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनवेळा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांनीही राहुल गांधींच्या भाषणामध्ये अडथळ आणत वारंवार आक्षेप घेतले होते. राहुल गांधींनी खोटे आरोप केले असून त्यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.