राहुल गांधींना गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयानं मोदींच्या अवमान प्रकरणी दोषी मानून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे नेमके राजकीय अर्थ आणि पडसाद काय असतील, यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सोप्या शब्दांत विश्लेषण केलं आहे.
“सुरतच्या न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर ज्या वेगानं पुढच्या सगळ्या कारवाया झाल्या, ते खरंच कौतुकास्पद आहे. खरं तर राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व निलंबन ही काँग्रेससाठी महत्त्वाची सुसंधी आहे”, असं निरीक्षण गिरीश कुबेर यांनी नोंदवलं आहे.