Rahul Gandhi Diwali Video: काँग्रेस नेते व लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी १०, जनपथ या सोनिया गांधींच्या १०, जनपथ या घरी स्वत: भिंतींचा खराब झालेला रंग घासून काढला व त्यावर नवीन रंगकामदेखील केल्याचं दिसत आहे. मात्र, यावेळी त्यांनी या घराबाबत केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे. याच व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी दिवाळी साजरी करणाऱ्या देशवासीयांना एक आवाहनदेखील केलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

राहुल गांधींनी रंगकाम व दिवे बनवण्याचं काम करणाऱ्या कारागीरांसोबत काम केल्याचा हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला एका दिवसात ४ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत तसेच, ४० हजारहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी त्यांच्या आईच्या म्हणजेच सोनिया गांधींच्या १० जनपथ या दिल्लीतील घरी रंगकाम करताना दिसत आहेत.

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi : “जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या होत्या”, प्रियांका गांधींची वायनाडमध्ये मतदारांना भावनिक साद
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Ratnagiri and Sindhudurg
कोकणातून काँग्रेसचा ‘हात’ गायब; रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांत एकही जागा नाही
Rahul Gandhi Upset With Maharashtra Congress Leaders?
Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”
Mahavikas aghadi Seat Sharing Formula
MVA Seat Sharing : मविआचं ठरलं! कोणी मोठा व लहान भाऊ नाही, सर्वांनाच सम-समान जागा
Khanapur Atpadi Assembly
खानापूर – आटपाडीत नेतेमंडळींच्या दुसऱ्या पिढीत लढत
housing policy, affordable housing Mumbai,
परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे गृहनिर्माण धोरण हवे! मुंबई ग्राहक पंचायतीच्या परिषदेत सूर
Amitabh Bachchan And Aishwarya Rai
‘खाकी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी ऐश्वर्याचा अपघात पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप; म्हणाले होते, “तिच्या पाठीवर निवडुंगाच्या…”

“आपल्या अर्थतज्ज्ञांच्या दृष्टीने हे कौशल्य नसतंच. हे वेगळंच काहीतरी असतं. आजकालची तरुण पिढी या प्रकारच्या गोष्टी बघत नाही. ते पूर्ण वेळ व्हॉट्सअॅप, मोबाईल फोन, आयपॅडवर बसलेले असतात. मी विचार केला की रेहाननंही (प्रियांका गांधींचा मुलगा) पाहायला हवं की हे काम कसं चालतं. मी या लोकांचं काम समजून घेण्याचा प्रयत्न करतोय”, म्हणतानाच रंगकाम करता करता आपल्या हातांची आग व्हायला लागल्याचंही राहुल गांधींनी मान्य केलं.

“एवढं कौशल्याचं काम आहे. पण त्यांना काहीही मान मिळत नाही. कुणी यांचं काम पाहात नाही. कुणी मान देत नाही. कुणी याबद्दल विचारच करत नाही”, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

राहुल गांधींना आवडत नाही १० जनपथ!

दरम्यान, सोनिया गांधींचं १० जनपथ हे घर राहुल गांधींना फारसं आवडत नसल्याचे संकेत व्हिडीओत त्यांनी केलेल्या एका विधानावरून मिळत आहेत. यासाठी राहुल गांधींनी त्यांच्या वडिलांचा म्हणजेच राजीव गांधींचा उल्लेख केला. “माझ्या वडिलांचं या घरात निधन झालं. त्यामुळे मला काही हे घर फारसं आवडत नाही”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

Rahul Gandhi : “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे..”, शरद पवारांचं वक्तव्य

आई व बहिणीसाठी बनवला दिवा

दरम्यान, यावेळी दिवाळीआधी राहुल गांधींनी दिल्लीत दिवाळीचे दिवे बनवणाऱ्या एका कुटुंबासोबत दिवेही बनवले. त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. “आपण त्यांना पाठिंबा सोडा, पण साधा प्रगती करण्याचा आत्मविश्वासही देत नाही. व्यवस्था त्यांना तो आत्मविश्वास देत नाही”, असं ते म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी त्या कुटुंबासमवेत आई सोनिया गांधी व बहीण प्रियांका गांधी यांच्यासाठी दोन दिवे तयार केले.

“देश चालवताना बॅकग्राऊंडवर खूप सारे लोक काम करत असतात. तुम्ही जी साफसफाई, रंगरंगोटी पाहाताय हे कुणीतरी केलंय. तुम्ही दिवे लावता तेही कुणीतरी तयार केले आहेत. ती कुणाचीतरी मेहनत आहे. जेव्हा लोक दिवे लावतील, तेव्हा त्यांनी याचा विचार करावा की हे दिवे कुणी बनवले, त्यांची मुलं काय करतात, जेव्हा ते आजारी पडतात, तेव्हा ते काय करतात”, अशा शब्दांत राहुल गांधींनी त्यांचं मत व्यक्त केलं.