Rahul Gandhi on Rajib Gandhi: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आज काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांना अभिवादन केलं जात आहे. राजीव गांधी यांच्याबद्दलच्या आठवणी ताज्या करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. राजीव गांधींचे पुत्र व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांसाठी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात आपल्या वडिलांची स्वप्न आपली मानून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राहुल गांधींनी नमूद केलं आहे.

“एक करुणामय व्यक्तिमत्व, सौहार्द व सद्भावनेचं प्रतीक”, अशी उपमा राहुल गांधींनी आपल्या वडिलांसाठी पोस्टमध्ये नमूद केली आहे. “बाबा, तुमची शिकवण माझी प्रेरणा आहे. भारतासाठीची तुमची स्वप्नं तीच माझीही स्वप्न आहेत. तुमच्या आठवणी सोबत घेऊन मी ती स्वप्नं पूर्ण करेन”, असं कराहुल गांधींनी वडिलांसाठी केलेल्या पोस्टमध्ये नमूद म्हटलं आहे. आज सकाळी राहुल गांधींनी दिल्लीतील वीर भूमीला भेट दिली. तसेच, राजीव गांधींना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

“राजीव गांधींचं अल्पकालीन प्रभावी राजकीय जीवन”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनीही देशाच्या राजकीय व तंत्रज्ञानविषयक पटलावरील विकासात राजीव गांधींच्या योगदानाचा सोशल पोस्टमध्ये उल्लेख केला.

“आज राजीव गांधींची ८०वी जयंती आहे. त्यांचं राजकीय जीवन अल्पकालीन पण अत्यंत प्रभावी ठरलं. १९८५ च्या अर्थसंकल्पात अर्थविषयक धोरणांचा एक नवा दृष्टीकोन मांडण्यात आला होता. या अर्थसंकल्पात राजीव गांधींची महत्त्वाची भूमिका होती. राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही आठवडे त्यांनी १९९१ च्या निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यावर बरंच काम केलं होतं. त्यातील आर्थित तरतुदींच्या पार्श्वभूमीवर नरसिंग राव-मनमोहन सिंग यांनी जुलै १९९१ मध्ये देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा राबवल्या”, असं रमेश यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींना चार ऑक्टोबर रोजी ‘म्हणणे’ मांडावे लागणार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक विधान

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी १९८४ साली काँग्रेसची सूत्रं हाती घेतली. अवघ्या ४०व्या वर्षी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. राजीव गांधी हे भारताचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान ठरले. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत राजीव गांधींची एलटीटीईच्या हस्तकांनी सुसाईड बॉम्बेच्या सहाय्याने हत्या केली.

Story img Loader