काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या दिल्लीत असून त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान विश्रांती घेतली असून सध्या आठवडाभर ते दिल्लीतच असणार आहेत. आज आपल्या वडिलांच्या समाधीस्थळी म्हणजेच वीर भूमीवर राहुल गांधी टी-शर्ट आणि ट्राऊजर्समध्ये अनवाणी चालताना दिसले. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असतानाही राहुल गांधी टी-शर्टमध्ये दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राहुल गांधींनी महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, लाल बहादूर शात्री आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळांना भेट देऊन आदरांजली अर्पण केली. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेदरम्यान पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसत आहेत. तामिळनाडूमधील कन्याकुमारीपासून सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेतील १०० दिवसांमध्ये बहुतांशवेळी राहुल हे पांढऱ्या टी-शर्टमध्येच दिसले.

भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपर्यंत जाणार आहे. या भागांमध्ये तापमान फारच कमी असल्याने आता राहुल गांधी पुढील यात्रेदरम्यानही याच कपड्यांमध्ये दिसणार का यासंदर्भातील चर्चा आजच्या समाधीस्थळांच्या दर्शनानंतर सुरु आहेत. यासंदर्भात राहुल गांधींना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थंडी वाजत नाही का या प्रश्नावर उत्तर दिलं.. “ते मला अनेकदा विचारत असतात की मला थंडी कशी वाजत नाही. मात्र ते शेतकरी, कामगार, गरीब मुलांना हा प्रश्न विचारत नाही,” असं राहुल म्हणाले.

“मी आतापर्यंत २ हजार ८०० कमी चाललो आहे. मात्र ही फार मोठी गोष्ट नाही असं मी मानतो. शेतकरी रोज फार चालतात. त्याचप्रमाणे शेतमजूर, कारखान्यात काम करणार कामगारही भरपूर चालतात,” असं राहुल यांनी लाल किल्ल्याजवळच्या भाषणात म्हटलं होतं. आता ही यात्रा दिल्लीमधून पुढील यात्रा सुरु करणार आहे. आपण कन्याकुमारीपासून इथपर्यंतचा प्रवास केला त्यामध्ये मला कुठेही लोकांमध्ये द्वेष दिसून आला नाही. “मला कुठेही भिती दिसून आली नाही,” असं राहुल म्हणाले.

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर द्वेष पसरवण्याचा आरोप करताना राहुल गांधींनी, “मी जेव्हा सुरुवात केली होती. मला वाटलं होतं की सगळीकडे द्वेष पसरला असेल. मात्र मला असं काही दिसल नाही. तुम्ही जेव्हा टीव्ही पाहता तेव्हा हिंदू-मुस्लीम, हिंदू-मुस्लीम वादच पहायला मिळतो. मात्र भारतामधील लोकांना हे महत्त्वाचं नाही,” असं म्हणाले.