राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी पक्षाची संपूर्ण जबाबदारी स्विकारायला हवी. तसेच त्यांनी अधिक सक्रियपणे माध्यमे आणि जनतेशी संवाद साधावा असा सल्ला यावेळी दिग्विज यांनी राहुल गांधींना दिला. मात्र, यावेळी दिग्विजय हे राहुल गांधींवरच नाही थांबले तर पी. चिदंबरम  यांची इच्छा असल्यास त्यांनी अध्यपदाची निवडणूक लढवावी असेही म्हटले.

Story img Loader