राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) केली. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला. यानंतर एकच खळबळ उडाली होती. शरद पवारांच्या निर्णयानंतर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भावुक झाले होते. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी राज्यभरातून राजीनामे दिले जात आहेत.

अशातच शरद पवार यांच्या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी फोन करत चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला याबाबत माहिती दिली आहे.

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”

हेही वाचा : “शिवसेनेपेक्षा मोदी राष्ट्रवादीला बरोबर घेण्यास अनुकूल होते”, ‘लोक माझे सांगाती’तील शरद पवारांच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले…

“राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडून शरद पवारांच्या राजीनाम्याचं कारण जाणून घेतलं आहे. तसंच, शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार विचार करावा, असं मत राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळेंकडे व्यक्त केलं,” अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली.

तर, “शरद पवारांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदी कायम राहावे, अशी इच्छा राष्ट्रवादीशी विचार जुळणाऱ्या पक्षांतील नेत्यांची आहे,” असं राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्याने सांगितलं.

हेही वाचा : “अजित पवार सांगतायत कुठेही जाणार नाही, पण…”, संजय राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, “राजकारणात…!”

केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी.सी. चाको म्हणाले, “केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयानंतर चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, असं बिगर भाजपाच्या नेत्यांचं मत आहे. तसंच, मीही या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती शरद पवारांना केली आहे,” असं पी.सी. चाको यांनी म्हटलं.