काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या “कोअर कमिटी’ बैठकीआधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
बैठकीच्या निर्णायक वेळेच्या अर्धातास आधीच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या कोअर कमिटीत स्थान नसलेले काँग्रेस मंत्री व्ही.नारायणस्वामी आणि दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनाही फोन करून बैठकीला बोलाविण्यात आले. संरक्षण मंत्री ए.के.अँटनी, अर्थमंत्री पी.चिदंबरम, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सचिव अहमद पटेल इत्यादी ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत.
याआधी पंतप्रधानांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही महत्वाची प्रलंबित विधेयके मंजूर करुन घ्यायची असल्याचे म्हटले होते. त्यानुसार या बैठकीत प्रलंबित विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात करण्यासाठी योग्य ते विधेयकाची आणखीही या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
‘कोअर कमिटी’ बैठकीआधी मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांचे गुफ्तगू
बैठकीच्या निर्णायक वेळेच्या अर्धातास आधीच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली
First published on: 10-01-2014 at 03:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi meets pm manmohan singh ahead of cong core group meet